Manoj Jarange Patil : आंतरवाली सराटी (जालना) : एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, सरकारकडे आता फक्त १० दिवस उरले आहेत. आता दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नसल्याचा इशारा त्यांनी या भाषणातून दिला. असे म्हणत त्यांनी पुढील लढ्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
अजून वाट पाहण्याची तयारी नसल्याचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात शनिवारी (त. १४) मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आजोजित करण्यात आली. या सभेला राज्यभरातून लाखो मराठा समाज बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले यावेळी वरील विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले की, कायदा सांगतो व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. शेती व्यवसायामुळे कुणबी प्रमाणपत्र दिली. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्यावतीने विनंती आहे की, सर्वांनी मिळून मराठा समाज आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्याचबरोबर ते म्हणाले की या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्रासह राज्याने तातडीने निर्णय घ्यावा.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि समावेश केल्याचा निर्णय जाहीर करावा. याचवेळी त्यांनी बोलताना देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा विनंती केली. ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारला या कोट्यवधी मराठा समाजाकडून हात जोडून विनंती करून सांगतो की सगळ्यात मोठा समाजाची विनाकारण हालअपेष्ठा करू नका.
दरम्यान, आज सरकारला जाहीरपणे शेवटची विनंती आहे की, मराठा समाजासाठी गठित केलेल्या समितीचे काम बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं, चार दिवसात कायदा पारित होणार नाही, एक महिन्याचा वेळ द्या. आधार घेऊन कायदा पारीत करतो. पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करा.’