(Baramati) बारामती, (पुणे) : वडीलांची आठवण जपण्यासाठी काटेवाडी (ता. बारामती) (Baramati) येथील एका कुटुंबियांनी चक्क दोन मजली इमारत उचलुन ९ फुट मागे सरकविण्याचा प्रयोग सुरु केला आहे. अकबर दादासाहेब मुलानी व हसन मुलाणी या भावंडांनी त्यांची तीन हजार फूट दुमजली इमारत चक्क ९ फूट मागे सरकविण्याचे काम सुरु केले आहे. त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आता हे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे…!
येत्या दोन ते तीन दिवसांत ही इमारत पाच फूट उंच उचलून नऊ फूट मागे घेतली जाणार आहे. यासाठी हरियाणा येथील मोहन लाल हाऊसिग लिप्टींग स्पिंटीग कन्ट्रक्शन कंपनी नूरबाला, पानिपत (हरियाणा) प्रशिक्षित ठेकेदार काम करीत आहेत.
काटेवाडी गावात संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. यामध्ये इमारत तोडावी लागणार होती. मुलाणी कुटुंबियांनी प्रतिकूल परस्थितीत पुर्वी आशियाना कॉम्प्लेक्स ही दुमजली वास्तु उभी केली होती. चार वर्षांपूर्वी अकबर मुलांणी यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांचे या इमारतीत वास्तव्य होते. त्यांची आठवण या इमारतीत आहे.
ती आठवण जतन करण्याची जिद्द मनापासून या कुंटूबाने बांधली. त्यामूळे पालखी महामार्गाला अडसर ठरणारी इमारत न पाडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पालखी मार्गात येणारी ही दुमजली इमारत पाडण्यासाठी या कुटुंबाचे धाडस झाले नाही. सोशल मिडीयावर उभी इमारत आहे तशी पाठीमागे घेता येते, हे त्यांना समजले. त्यांनतर त्याच पध्दतीने इमारत मागे घेण्याचा निर्णय घेतला.
मोहनलाल नावाच्या या ठेकेदाराने आत्तापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह अन्य राज्यातील एक हजारांहून अधिक इमारती मागे घेतल्याचा दावा केला आहे. आता काटेवाडीतील मासाळवाडी परिसरातील हा प्रयोग सुरू आहे.
दरम्यान, नव्याने इमारत उभी करण्यासाठी ५० लाख रुपये खर्च येणार होता. सोशल मीडियावर हरियाणातील या पध्दतीचे काम करणाऱ्यांबाबत माहिती मिळाली. त्यांनी या सर्व इमारतीचा मागे घेण्याचा दहा लाख रुपयाहून जास्त खर्च सांगितला. इमारत पाडण्यापेक्षा ती मागे घेऊनच त्याचा पुर्नवापर करता येणे शक्य आहे. त्यासाठी हा पर्याय निवडला आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Accident | चांदणी चौक परिसरात खाजगी बस १५ फूट खाली कोसळली; बसमध्ये 35 प्रवासी!