दौंड, (पुणे) : दौंड शहरातील भाजी मंडईत फळाच्या दुकानासमोर थांबल्याने किरकोळ कारणावरून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान आरडाओरडा करणाऱ्या दहा जणांना दौंड पोलिसांनी अटक केली.
वाहिद हाशम शेख (रा. विठ्ठलवाडी मंदिरासमोर दौंड), रफिक अब्दुल रहेमान बागवान (रा. गांधी चौक इंदिरानगर), सलमान गफार शेख (रा.गांधी चौक इंदिरानगर), अफजल इस्लाम शेख (रा.साईबाबा मंदिर आग्रवाल शाळेशेजारी दौंड), बिट्टू कुमार अनिल मोदी (रा. बार्बन माता. ता. बागलपूर जि. बेहरपूर), फंटूस कुमार प्रकाश यादव (रा. बार्बन माता. ता. बागलपूर जि. बेहरपूर), शंकर कुमार निरंजन माहतो (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), कारू कुमार निरंजन माहतो (रा.बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), पप्पू महेश चौधरी (रा. बार्बन माता. ता. बागलपूर जि.बेहरपूर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहराच्या भाजी मंडईत दोन गटात हाणामारी सुरु होती. आरोपींनी एकमेकांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून जोरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता दोन्हीही गटात मारामारी सुरु होती. पोलिसांनी दोन्हीही गटाच्या लोकांना बाजूला घेऊन दौंड पोलीस ठाण्यात आणले. भांडणाचे कारण विचारल्यावर त्यांनी फळाच्या दुकानासमोर थांबल्याने किरकोळ कारणावरून वाद झाल्याचे सांगितले. करमचंद बंडगर यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी वरील दहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुभाष राऊत, अमीर शेख, करम बंडगर, योगेश पाटील, किरण पांढरे आदींनी केली आहे.