Pune Cyber Crime : पुणे: पुण्यातील नारायण पेठेतील एका वृध्द महिलेला ब्लिंकिटवरून फळ मागवणे महागात पडलं आहे. एक क्षुल्लक चूकीमुळे महिल्याच्या बॅंक खात्यातील 79 हजार रुपये गायब झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस याचा तपास करत आहे. Cyber Crime

हेही वाचा- निवडणूकीच्या तोंडावर भाजप नेत्याच्या घरी आढळली लाखोंची रोकड, राजकारणात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नारायण पेठेतील ज्येष्ठ महिलेने 15 नोव्हेंबर रोडी ब्लिंकिट या अॅपवरून 450 रुपयांची फळ आणि भाज्या मागवल्या होत्या. 10 मिनीटांत फळ आणि भाज्या घरी पोहचल्यानंतर त्यांना उघडून पाहताच, सर्व फळे खराब निघाले. तो माल परत करण्यासाठी अॅपच्या अधिकृत साईटऐवजी गुगलवरून ब्लिंकिट कस्टमर केअरचा नंबर शोधला. गुगलवर सापडलेला तो नंबर प्रत्यक्ष सायबर स्कर्मसचा होता.

कस्टर केअरशी बोलायचं म्हणून तीनं तो नंबर डायल केला आणि समोरून कस्टमर केअर प्रतिनिधी असल्याचं सांगून रिफंड मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. महिलेच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली आणि तीला माहिती भरण्यास सांगितली. रिफंड मिळवण्याच्या बहाणे स्कॅमर्सने महिलेच्या बँक खात्यातून 79,208 रुपये लंपास केले.
मोबाईलवर तीला बॅंकेतून मेसेज येताच हादरा बसला. महिलेने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यास सुरु केला आहे.






