Crime : तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ऑगस्टीन जोशुआ आणि तिरुवल्लूरमधील २४ वर्षीय तरुणीचं नुकतंच लग्न झालं होतं. मॅट्रीमोनियल वेबसाइटवरून जमलेलं हे लग्न २३ नोव्हेंबरला पार पडलं. लग्नानंतर नवरीचं सासरी मनापासून स्वागतही झालं. विधी-विधाने संपल्यावर दोघं नवरा–नवरी आपल्या खोलीत गेले. crime

अरेंज मॅरेज असल्यामुळे नवरीची इच्छा होती की पहिल्या काही दिवसांत दोघांनी एकमेकांशी बोलावं, ओळख वाढवावी. पण जोशुआने तत्काळ शारीरिक संबंधांची मागणी केली. नवरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, “थोडा वेळ घेऊ, आधी बोलू, एकमेकांना समजू.” पण जोशुआला हे मान्य नव्हतं. तो रागावून दुसऱ्या खोलीत निघून गेला.
थोड्याच वेळात तो हातात हातोडा घेऊन परत आला आणि संतापाच्या भरात त्याने नवरीवर हल्ला केला. मुलगी गंभीर जखमी अवस्थेत कोसळली. जोशुआला वाटलं की ती वाचणार नाही, आणि तो तिथून पसार झाला. सकाळी कुटुंबीयांना मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच तिला रुग्णालयात पोहोचवलं, आणि वेळेवर उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला.

रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर नवरीने पोलिसांना सांगितलं की, जोशुआशी तिने लग्न केलं कारण तो हुंडा न घेणारा मुलगा आहे असं तिला सांगण्यात आलं होतं. पण लग्नाच्या रात्रीच तिला कळलं की त्याचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. आता तिने जोशुआसोबत पुढे संसार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून जोशुआचा शोध सुरू आहे






