Pune Crime: पुण्यात हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कोथरुड, आणि कात्रज यांसारख्या अनेक भागांत छोट्या-मोठ्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना पुणे पोलिसांनी आता थेट जनतेसमोरच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. (Pune Koyata Gang)

काही दिवसांपूर्वी शहरात टोळीयुद्ध भडकले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी टोळ्यांच्या नांग्या ठेचल्या होत्या आणिअ नेक आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली होती. तरीही पुण्यातील गुन्हेगारी कमी होत नसल्यामुळे पोलिसांनी आता थेट आरोपींना नागरिकांसमोर ‘चोप देण्याचा’ पर्याय निवडला आहे.

हेही वाचा: साहेब आले की उभे रहा..! सरकारच्या निर्णयामुळे चर्चेला उधान; काय आहे नवीन GR?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी फुरसुंगीत आरोपींनी हातात कोयते घेऊन 20 ते 25 गाड्यांची तोडफोड केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली.
अटक केल्यानंतर पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या या तरुणांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांना त्याच ठिकाणी घेऊन गेले, जिथे त्यांनी गाड्यांची तोडफोड केली होती. पोलिसांनी नागरिकांसमोरच या आरोपींना धडा शिकवला. रस्त्याच्या कडेला पडदा लावून, एका-एका आरोपीला पडद्याआड नेत लाकडी दांड्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर, पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर देखील चालायला लावले. पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा: पुणेकरांनो..! नवले पुलावरील अपघातानंतर नवा नियम जारी; उल्लंघन करणाऱ्यावर होणार मोठी कारवाई






