Breaking News: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांची प्रकृती खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना मागील बारा दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते पंरतू आज सकाळी त्यांच निधन झाल्याचे दुखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेमाने एक महान कलाकार आणि सदाबहार व्यक्तिमत्त्व गमावला आहे. (Dharmendra Passes Away)

हेही वाचा- पुण्यात कोयता गँगच्या नांग्या ठेचल्या! पोलिसांनी गुन्हेगारांना पडद्याआड नेलं अन् असं काही केलं की…
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आज सकाळी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचं निधन झाले.
सनी व्हिला या बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढली आहे. पोलीस दलाव्यतिरिक्त धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुमारे 50 खाजगी सुरक्षा रक्षकांची एक टीमदेखील उपस्थित आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरला आहे.






