पुणे: पुण्यातुन ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची घटना समोर आली आहे. गुंतवणुकीच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पुनम प्रशांत गोलाईत (वय 41, रा. आंबेगाव खुर्द) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. दोन्ही गुन्ह्यांत या प्रकरणी (ता. 28 एप्रिल) पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुनम प्रशांत गोलाईत (वय 41, रा. आंबेगाव खुर्द) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात सायबर चोरट्यांनी 6 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये फिर्यादी महिलेला गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्यांची 15 लाख 48 हजार 124 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चोरमले तपास करीत आहेत.