पुणे PMPML News : पीएमपीने आता बस प्रवासासाठी तिकिटाचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. (PMPML News) त्यानुसार आता येत्या बुधवारी (ता.10) या सुविधेची चाचणी घेतली जाणार आहे. (PMPML News) अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. (PMPML News)
यंत्रणेला केंद्र सरकारच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) हिरवा कंदील
बस प्रवासासाठी सुविधा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला होता. पण, त्यावर सुरक्षेचा ठपका ठेवत अनेक आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, पीएमपीने ही सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या यंत्रणेला केंद्र सरकारच्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया (एसटीपीआय) हिरवा कंदील दिला आहे
पीएमपीचे तिकीट काढण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा वापरण्यासाठीचे प्रमाणपत्र पीएमपीला सोमवारी मिळणार आहे. त्यानंतर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर बकोरिया यांनी प्रवासी सेवा अधिक गतिमान करण्यासाठी बसमध्ये तिकिटासाठी ऑनलाइन पेमेंट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार, एका कंपनीस हे कामही देण्यात आले होते. मात्र, कंपनीने विकसित केलेली यंत्रणा सुरक्षित नसल्याच्या तक्रारी आल्या. तसेच कोणत्याही सरकारी कार्यालयास नागरी सेवा देण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा द्यायची असल्यास केंद्राने नेमलेल्या संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे लागते. त्यानुसार, या यंत्रणेचे सुरक्षा ऑडिट “एसटीपीआय’कडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आता या निर्णयाचा फायदा तब्बल दहा लाख प्रवाशांना होणार असून आता सुटे पैसे नसले, अथवा पाकीट घरी राहिले तरी ऑनलाइन पेमेंटद्वारे प्रवास करता येणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीएमपीने डीजीटलायझेशनकडे जाण्यासाठी हा महत्वाचा टप्पा आहे. त्याचा, फायदा प्रवाशांना होणार आहे. बेस्ट ने ऑनलाईन तिकिट सेवा सुरू केल्याने तिकिट छपाईचे कागद व प्रिटींगचे दोन कोटी वाचले आहेत. त्यामुळे पीएमपीलाही याचा फायदाच होईल. तसेच, सुट्टया पैशांवरून होणारे वाद संपणार आहेत. असे संजय शितोळे या प्रवाशाने माध्यमांना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
PMPML | पुणेकरांना आता लवकरच पीएमपीत मिळणार ऑनलाइन तिकीट ; पीएमपीएमएल अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया
Pune Crime | पुणे : मोटारचालकाची मुजोरी; पीएमपी चालकाला केली मारहाण