Pimpri News : पिंपरी : राज्यभर मराठा आरक्षणासाठी मोर्चा, आंदोलने, जाळपोळ, आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत लाक्षणिक, साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलकांनी महामार्ग रोखू नये, महामार्गावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर पोलिसांनी गस्त वाढविली आहे. आंदोलक रस्त्यांवर टायर जाळतात. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर पडलेले तसेच गॅरेजसमोर ठेवलेले टायर देखील जप्त केले आहेत.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन
राज्यात कुठेही आंदोलन झाले तरी त्याचे पडसाद महामार्गांवर उमटतात. पिंपरी-चिंचवड शहरातून तीन महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग जातो. पुणे-बंगळुरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हे शहरातून जाणारे प्रमुख महामार्ग आहेत.(Pimpri News) त्यामुळे पोलिसांनी महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजादेखील बंद केल्या आहेत.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. निगडीतील तहसील कार्यालयावर २ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील खंडोबा माळापासून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होणार आहे.(Pimpri News) दरम्यान, चौकटीत राहूनच आंदोलन करावे. जाळपोळ करू नये, खोट्या पोस्ट, अफवांवर विश्वास ठेवू नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण चिघळत असतानाही राजकारणी आपली भूमिका जाहीर करत नसल्याने, राजकारण्यांबद्दल मराठा समाजाच्या मनात प्रचंड नाराजीची भावना आहे. (Pimpri News) खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांच्याविषयी समाजात नाराजी आहे. येत्या २४ तासांत आमदार, खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा लवकरच समाज भेटीला येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भारतीय एकात्मता हीच सरदार पटेल यांना आदरांजली : विनय पत्राळे
Pimpri News : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहुंजे मैदान परिसरात बंदोबस्तात वाढ
Pimpri News : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्री; १४ लाखांचा ऐवज जप्त