Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : मराठा आंदोलनामुळे लालपरीला सक्तीची विश्रांती; आतापर्यंत एसटीचे २० कोटींचे नुकसान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 November 2023, 11:27

Pune News : पुणे : मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मोडतोड, जाळपोळ सुरू आहे. अनेकदा आंदोलकांकडून लालपरीला लक्ष केले जाते. परिणामी खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी लालपरीला सक्तीची विश्रांती देण्यात येत आहे. यामुळे राज्य परिवहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकले आहे. कोरोना काळानंतर आता मराठा आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. मराठा आंदोलनामुळे गेल्या काही दिवसांत एसटीचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्य परिवहन मंडळ पुन्हा आर्थिक गर्तेत अडकले

राज्यात मराठा आंदोलन उग्र झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सर्वत्र साखळी उपोषण आणि ‘रास्ता रोको’ आंदोलन केले जात आहे. मात्र, आंदोलकांकडून लालपरीला लक्ष केले जात आहे.(Pune News)  यामुळे काही ठिकाणी एसटी बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत होती. एसटीला चांगले दिवस येत होते. परंतु मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. त्याचा थेट फटका एसटी महामंडळाला बसला आहे. एसटी महामंडळाचे आतापर्यंत सुमारे १७ ते २० कोटींचे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षणाची तीव्रता वाढत असताना सर्वत्र एसटी बसेसवर जाळपोळ आणि दगडफेक होत आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये दोन दिवसांपासून एकही बस बाहेर पाठवली जात नाही. तसेच बस स्थानक बस येत नाही. यामुळे बस स्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला आगारातून सुमारे १३२ गाड्या रद्द केल्या आहेत. (Pune News) यामुळे येवला आगाराचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. नागपूर विभागाच्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात जाणाऱ्या बस फक्त पुसदपर्यंत पाठविण्यात येत आहेत. यामुळे नागपूर विभागाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : तृतीयपंथीयांचा कात्रज पोलीस चौकीत गोंधळ; पोलिसांनाही धक्काबुक्की

Pune News : जिल्ह्यातील शेकडो कलाकारांचे मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी साखळी उपोषण

Pune News : कात्रजमध्ये अग्नितांडव! गॅस सिलिंडरच्या स्फोटात झोपड्या जळाल्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Sanjay Raut Criticize Pm Narendra Modi: “मनोज जरांगेंच्या जीवाचं काही बरंवाईट झालं, तर...संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.