Pimpri News : पिंपरी चिंचवड : सहा वर्षीय चिमुकलीचा स्विमिग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रावेत येथे घडली आहे. येथील सेंटोसा वॉटर पार्कमधील स्विमिग पुलामध्ये सोमवारी ( दि.12) दुपारी ही घटना घडली आहे. ही चिमुकली आई व भावासोबत पिकनिकला आली असताना हा प्रकार घडला आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात सेंटोसा वॉटर पार्कच्या मॅनेजर व सुपर वायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजर अजय हरीलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर) व सुपरवायझर राहुल आबा मोरे (रा. रावेत) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. (Pimpri News) पोलीस हवालदार राकेश शांताराम पालांडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलगी ही सेंटोसा पार्क येथे तिची आई व दोन भावासह पिकनिकला आली होती. यावेळी तेथे कोणताही सुरक्षा रक्षक नसताना,(Pimpri News) कोणतेही सुरक्षा भिंत,लाईफ जॅकेट अशी कोणतीच सुविधा नसल्याने मयत मुलगी थेट स्विमिंग पूलच्या पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. यावरून वॉटर पार्कच्या यंत्रणेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून लैंगिक अत्याचार
Pimpri News : भोसरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या