Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधील रहाटणी येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याचा संशयातून महिलेला त्रास दिला जात होता त्यातूनच तिने पती व घरातील इतर सदस्याच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. (Married woman commits suicide due to harassment in Rahatni)
पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी मृत विवाहितेच्या बहिणीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पतीसह तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 15 मे ते 9 जून या कालावधीत रहाटणी येथे घडली आहे.(Pimpri News) शिवलिंग संग्राम बोधने, पती (रा.रहाटणी), शिवप्रसाद उर्फ प्रसाद बेल्लाळे (रा. रहाटणी) व महिला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या बहिणीविषयी महिला आरोपी व शिवप्रसाद हे पतीच्या मनात मयत पत्नी विरोधात चारित्र्याचा संशय़ निर्माण करत होते. (Pimpri News) त्यामुळे आरोपी पतीने त्यांचे ऐकून पीडितेला त्रास दिला. त्याच्या या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : खुनाचे सत्र सुरुच मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून
Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद
Pimpri News : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना ठोकल्या बेड्या..