Pimpri News : पिंपरी : परमेश्वर कृपेने आयुष्यात सर्व काही चांगले वाट्याला आले. त्यामुळे जीवनाविषयी मी कृतार्थ आहे, असे भावोद्गार ह.भ.प. सुचेता गटणे यांनी भोईरनगर, चिंचवड येथे बुधवारी (ता. १८) काढले.
‘चला जाऊ या साहित्यिकांच्या घरी’ उपक्रमांतर्गत सन्मान
शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार आणि साहित्यिक सुचेता गटणे यांच्या निवासस्थानी जाऊन ह. भ. प. अशोक महाराज गोरे यांच्या हस्ते त्यांचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ प्रदान करून हृद्य सन्मान करण्यात आला. (Pimpri News) याप्रसंगी तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या स्वरचित भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण प्रास्ताविकात म्हणाले की, “अध्यात्मिक क्षेत्रासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या विदुषीचा नवरात्री महोत्सवात सन्मान करण्याची संधी शब्दधनला मिळाली ही आनंदाची बाब आहे.” शब्दधनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या मनोगतातून गटणे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीची माहिती दिली; तर महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी गटणे कुटुंबियांशी असलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला. (Pimpri News) सुवर्णरेखा इतराज आणि शालिनी अवचार यांनी त्यांची अध्यात्मातील वाटचाल कथन केली; तर कवयित्री शोभा जोशी आणि शामराव सरकाळे यांनी भक्तिरचना सादर केल्या.
सन्मानाला उत्तर देताना सुचेता गटणे पुढे म्हणाल्या की, “माझे माहेर पंढरी’ , ‘चैत्रांगण’ , ‘काकड आरतीचा संग्रह’ , ‘श्री नर्मदा प्रदक्षिणेच्या मार्गावरील तीर्थक्षेत्रे’ , ‘पूजेतील वस्तू आणि त्यांचे महत्त्व’ या पाच पुस्तकांचे लेखन हातून झाले असले, तरी मी स्वतःला साहित्यिक मानत नाही; कारण हे सर्व भगवंताने करवून घेतले आहे.(Pimpri News) तरीही हा घरगुती सन्मान चिरस्मरणीय राहील.” सुरेश गटणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अशोक महाराज गोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “शब्दशारदा सुचेतामाई यांचे कार्य समाजप्रबोधनाचे आहे. प्रपंच आणि परमार्थ यांची सुरेख सांगड त्यांनी आपल्या जीवनात घातली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान म्हणजे सद्गुणांचा सन्मान आहे,” असे विचार व्यक्त केले.
शंतनू गटणे, सचिन गटणे, आनंद मुळूक, प्राची गटणे, कविता गटणे, शोभा कोराटे, प्रतिभा जोशी आणि शब्दधनचे पदाधिकारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. (Pimpri News) प्रदीप गांधलीकर यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फुलवती जगताप यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : आई, बहिणीवरून अश्लील शिव्या दिल्याच्या रागाने गळ्यावर चाकूने वार; दोघांना अटक