Pimpri News : पिंपरी चिंचवड : मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. या काळात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे जरांगे पाटील म्हणाले होते. सरकारला दिलेली मुदत काल संपली. मात्र, अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये देखील जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड शहरातील नेत्यांना आणि पुढार्यांना सभा तसेच कार्यक्रम घेऊ दिला जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे.
नेते, पुढार्यांच्या सभांनाही बंदी
मराठा आंदालनाचे आता राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. तीन जणांनी राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सभा घेत आहेत. (Pimpri News) मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ४० दिवसांची मुदत संपली असून ते आजपासून उपोषण करणार आहेत.
या वेळी पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकल मराठा बांधवांकडून साखळी उपोषण केले जात आहे. मराठा बांधव म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. गेली ४० वर्ष झाले, मराठा समाजाची केंद्र आणि राज्य सरकार फसवणूक करत आहे. (Pimpri News) आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. सरकारने टिकणारे उपोषण देऊन मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या थांबवाव्यात. जोपर्यंत जरांगे पाटील हे उपोषण करणार आहेत, तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण करणार आहोत. दरम्यानच्या काळात शहरातील कुठल्याही नेत्यांना, पुढाऱ्यांना सभा, कार्यक्रम घेऊ देणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : संक्रमण काळातील योगदान समाजासाठी दिशादर्शक : प्रा. डॉ. सदानंद मोरे