Pimpri Crime | पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील हिंडवडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून हा छळ करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथील अनंतानगर येथून समोर आला आहे.
याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
विशाल विलास सांगळे (वय 26), विलास सांगळे (वय 55), वैभव विलास सांगळे (वय 24), एक महिला (वय 50, सर्व रा. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…
तक्रारदार विवाहितेच्या सासरच्या लोकांनी विवाहितेसोबत वारंवार वाद घातला. लग्नात मानपान केला नाही, हुंडा दिला नाही, या कारणावरून तक्रारदार यांच्या आई वडिलांकडे पैशांची मागणी केली. तसेच महिलेल्या चारित्र्यावर संशय घेऊन मुलगा पाहिजे असल्याचा आग्रह केला. व शारीरिक व मानसिक छळ करून लग्नात दिलेले स्त्रीधन विवाहितेकडून काढून घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!