लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : सुरुर- पोलादपूर राज्य मार्गावर पाचगणी नजीक भोसे खिंड जवळ रस्त्याच्या कडेला वठलेल्या झाडाच्या फांद्या प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. या धोकादायक फांद्यांची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. (The branches of dead trees on the road near Bhose pass are causing trouble to the commuters)
प्रवाशांना जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे प्रवास
मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मनामा फॅक्टरी समोरील एका वठलेल्या झाडाची फांदी धोकादायक झाल्याने या रस्त्यावरून ये-जा करणा-या प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. (Pachgani News) सध्या मुख्य पर्यटन हंगाम सुरू असल्याने निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दुचाकी, चारचाकीमधून मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यामुळे पाचगणीत- महाबळेश्वर पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे.
१३ जून २०१९ मध्ये अभिनेता अमीर खान यांच्या घरासमोर दुचाकीवर झाडाची फांदी पडून पर्यटक महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. मृत्यूच्या घटना घडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रिस्त असल्याने नागरिकांच्या रोषाला बांधकाम विभागाला सामोरे जावे लागत आहे. (Pachgani News) सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सुकलेले झाड छाटले नाही तर गंभीर दुर्घटना घडू शकते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News| खिंगर जिल्हापरिषद शाळेतील रेहाना अबिद भालदार यांचा निरोप समारंभ….
Pachgani News : गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी विचारांची आज संपूर्ण विश्वाला गरज ; बाळकृष्ण देसाई