Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ‘ती’ आठ अवयव देऊन गेली; भिगवण अपघातातील मृत चेश्ता हिचे अवयवदान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 December 2024, 15:25
Wannabe Pilot Gives Life To 5 Persons In Her Death Through Organ Donation

भिगवण: घरातील अतिशय लाडकी कन्या म्हणून तिचं अस्तित्व होतं. ती धाडसी होती. त्यामुळेच ती वैमानिक होण्यासाठी बारामतीत आली होती. मात्र, उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचं अपघातात निधन झालं. परंतु, तिच्या स्मृती कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून कुटुंबीयांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांनी जगण्याची लढाई संपली; तरी हृदय, डोळे, किडनी यांसह आठ अवयव दान करण्यात आले. कुटुंबीयांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बारामतीतील पायलट ट्रेनिंग संस्थेत शिकणारे कृष्णाशू मंगल सिंग, दक्षु विष्णू शर्मा, चेश्ता ज्योतीप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कणसे हे चौघेजण भिगवण (ता. इंदापूर) उजनी पाणवठ्यावर ९ डिसेंबरच्या पहाटे तीनच्या दरम्यान निघाले होते. कृष्णाशू हा गाडी चालवत होता. त्याच्या शेजारी दक्षु शर्मा तर पाठीमागे चेश्ता व आदित्य बसले होते. गाडी जैनकवाडी (ता. बारामती) येथील घाटाच्या पहिल्या वळणावर आली, तेव्हा कृष्णाशू याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि गाडी अगोदर रस्त्याकडेच्या झाडाला धडकून लोखंडी पाइपलाइनवर पलटी झाली. या भरधाव जाणाऱ्या गाडीचा वेग तब्बल १९० किलोमीटर ताशी होता असे तपासात निष्पन्न झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडी तब्बल १४० फूट अंतरापर्यंत घासत गेली. यामध्ये आदित्य कणसे व दक्ष शर्मा हे दोघे जागीच मृत झाले. तर, चेश्ता व कृष्णाशु जखमी झाले.

चेश्ता गंभीर जखमी झाल्याने हिला पुण्यातील रुबी हॉल या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान आठ दिवसांनंतर मंगळवारी (दि. १७) मृत्यू झाला. दरम्यान, जखमी कृष्णाशु हा उपचारातून बरा झाला असून त्याला दवाखान्यातून सोडण्यात आले आहे.

राजस्थानमधल्या ज्योतीप्रकाश बिश्नोई या व्यावसायिकाची चेश्ता ही कन्या होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यामध्ये चेश्ता ही त्यांची लाडकी होती. ती शिक्षणासाठी बारामतीत आली होती. अपघातात तिचा ब्रेन डेड झाल्याने उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पालकांनी तिच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. यामध्ये हृदय, किडनी, डोळे यांसह आठ अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी तिला सहकाऱ्यांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. ती धाडसी होती. ती नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी अग्रेसर असल्याची भावना तिच्या प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

महिलेच्या डोक्यात हातोडा मारून गळ्यातील सोनसाखळी पळवली; सांगावी येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp