पुणे: इचलकरंजी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांची पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिवटे यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी हा आदेश जाहीर केला आहे. या नियुक्तीमुळे, पुणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. दरम्यान, दिवटे यांचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी वाद झाले होते. त्यानंतर इचलकरंजी पालिकेच्या आयुक्त पदावरुन दिवटे यांच्याकडील प्रशासक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. आता पुणे पालिकेच्या अतिरिक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिवटे यांच्या नियुक्तीमुळे पालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची सर्व पदे भरण्यात आली आहेत. तथापि, दिवटे यांच्या नियुक्तीमुळे महापालिका प्रशासनात स्थिरता आणि कार्यक्षमता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.