उरुळी कांचन, (पुणे) : सोरतापवाडी ग्रामपंचायत व लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध उपक्रमाच्या शिबिराचे आयोजन सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संग्ल्नीत समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास आणि लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ०५ ते ११ जानेवारी २०२४ ला या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सोरतापवाडी गावच्या सरपंच संध्या चौधरी, उपसरपंच रवींद्र गायकवाड यांच्या प्रेरणेने व ग्राम विकास अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ग्राम व स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले व नागरिकांना प्लास्टिक मुक्त भारताची संकल्पना समजून सांगण्यात आली.
दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निकम एस. आर, प्रा. डॉ. स्नेहा बुरगुल, डॉ. बुरगुल एस. जी. सदस्य प्रा. भिसे, प्रा. कुंभार, प्रा. नाईक, ग्रामपंचायत सेवक वर्ग सर्व स्वयंसेवक व नागरिकांची ग्राम स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला.