केडगाव : बैलाचा खेळ दाखवून, लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील नंदिवाले जमात ही जमात खरंतर तमिळनाडूमधून महाराष्ट्रात आली. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरून आपला उदरनिर्वाह करू लागली. हे गाव की ते गाव असे असल्यामुळे त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रासाठी लागणारे कसलेही पुरावे नसल्यामुळे नंदिवाले समाजाला जात प्रमाणपत्राच्या अभावी शिक्षण व नोकरीच्या सुविधांपासून कित्येक वर्षे वंचित राहावे लागत होते.
नंदीवाले समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सातत्याने प्रयत्न करून त्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केले व भांडगावमध्ये वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजाच्या ५० नागरिकांचे जात प्रमाणपत्राचे वाटप आमदार कुल यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर जातीचे दाखले मिळाल्यानंतर गोरगरीब नंदीवाले समाजाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहायला मिळाले.
यावेळी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष शाम कापरे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव दोरगे, विजराज दोरगे, प्रमोद दोरगे, संदीप दोरगे, रामदास तात्या दोरगे, सोमनाथ हरपळे, संतोष कदम आणि यवत येथील महा-ई सेवा केंद्राचे अजय पांढरे उपस्थित होते.