पुणे : पुणे-लोणावळा या मार्गाने तुम्ही उद्या जर प्रवास करणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर पडा. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे ते लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवारी ७ जानेवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळादरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या बदलांची दखल घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक रद्द राहील.
- पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ३ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी ३.४७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी ४.२५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी ५.२० वाजता सुटणारी रद्द राहील.
- लोणावळ्याहून शिवाजीनगरला सकाळी १०.०५ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी २.५० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- तळेगावहून पुण्यासाठी दुपारी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ५.३० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी ६.०८ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
- लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
याचबरोबर एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस ३.३० तास विलंबाने धावणार आहे.