राजेंद्रकुमार शेळके
Manchar News : पुणे : मंचर येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि बहुभाषिक कवी मोहम्मद शकील जाफरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच, रत्नागिरी व पुणे जिल्हा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय कविसंमेलनात करण्यात आला गौरव
गेल्या ३६ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्ता, (Manchar News) जादूगार, बहुभाषिक कवी, मुक्त पत्रकार, व्याख्याता, लेखक आणि नाणे, नोटा व टपाल तिकिटांचे संग्राहक म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत.
या वेळी विजय वडवेराव, मनोज जाधव, जयद्रथ आखाडे, भावना खोब्रागडे, वैशाली लांडगे, सुभाष उगाले, संतोष मोहिते, संजय मोरे, सतीश शिंदे, महेंद्र पाटील, बबन धुमाळ, प्रतिभा किर्तीकर, सुनील जाधव, दीपक जाधव, दादासाहेब सोनावणे, उषाताई खोपडे आणि अशोक पवार या व्यतिरिक्त अनेक कवी वा कार्यकर्ते उपस्थित होते. (Manchar News) सतीश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उषाताई खोपडे यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Manchar News : आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले
Manchar News : प्रभाकर बांगर यांच्यावर हल्ल्यातील आरोपींना अटक करा – देवदत्त निकम..