Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manchar News : आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 11 October 2023, 15:15

Manchar News : मंचर, ता.११ : बिबट्याने आईच्या कुशीत झोपलेल्या आठ महिन्याच्या मुलाला ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील फुटाणेमळ्यात बुधवारी (ता.११) पहाटेच्या सुमारास घडली आहे. मात्र आईने आपल्या जीवाची पर्वा न करता बिबट्याच्या हल्ल्यातून पोटच्या गोळ्याला वाचविले आहे. त्यामुळे ती फक्त आईच करू शकते. याचा प्रत्यय आंबेगावकरांना आज आला आहे.

पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी

देवा धोंडीभाऊ करगळ असे वाचलेल्या मुलाचे नाव आहे. तर सोनल धोंडीभाऊ करगळ असे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविलेल्या मातेचे नाव आहे. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात हा छोटा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फुटाणेमळा येथील सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडीभाऊकरगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता. मेंढपाळ धोंडीभाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिचा आठ महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याचे बाहेर झोपली होती. रात्री दोन वाजता देवा या मुलाचा हात अंथुरणाच्या बाहेर आला होता. तेव्हा बिबट्याने हल्ला करण्याच्या उद्देशाने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सोनल करगळ यांना अचानक जाग आली.

तिने पहिले असता, मुलाच्या हाताला ओढत असलेल्या बिबट्या आढळून आला.त्यानंतर सोनल यांनी तातडीने बिबट्याला प्रतिकार केला. एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत एका हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. या दरम्यान जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनीही आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात आठ महिन्याचा मुलगा देवाच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत.

 

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी, बिबट रेस्क्यू सदस्य यांनी मेंढपाळ कुटुंब यांना धीर दिला. आणि मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलावर मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन कर्मचाऱ्यांनी सकाळी येऊन घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

याबाबत बोलताना मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या की, हा परिसर बिबट्या प्रवन क्षेत्र असल्यामुळे मेंढपाळांनी रात्रीच्या वेळेस झोपताना खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी विजेची व्यवस्था असेल त्या ठिकाणी झोपावे च कुटुंबातील सदस्यांनी राखणदारी करावी. असे आवाहन राजहंस यांनी केले आहे

दोन दिवसापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

दोन दिवसापूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता आंबेगाव तालुक्यातही बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावुन बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहे.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मेट्रो येतेय, आता रस्तेही होणार चकाचक! हिंजवडीतील 8 स्टेशनभोवती 21 रस्त्यांचा मोठा प्लॅन

Tuesday, 6 October 2026, 9:27
Accident

मिसिंग लिंकवर पहाटे 2 अपघात! आधी केळीचा टेम्पो पलटी, नंतर बस-ट्रकची धडक; 7 जण जखमी

Tuesday, 6 October 2026, 9:14

राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा मोठा गेमप्लॅन! जुन्यांना बाजूला करत नव्या चेहऱ्यांना संधी, मोदींच्या मंत्रिमंडळातही फेरबदल?

Tuesday, 6 October 2026, 9:00

गुप्तांग कापलं अन् ठेचून केलं चुरा! रसिक दुलारी यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, नेमकं काय घडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट

Tuesday, 6 October 2026, 8:39

सोनं-चांदी महागणार? GST परिषदेत प्रस्ताव, नेमकं काय होणार? जाणून घ्या

Tuesday, 6 October 2026, 8:31

रायफल साफ करताना अचानक सुटली गोळी! 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू; लोणावळ्यात खळबळ

Tuesday, 6 October 2026, 8:22
Next Post

Daund News : कावळ्यांची काव... काव दुरापास्त; पितृपक्षात अन्नघास भरवायलाही कावळे मिळेनात!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp