उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. 01) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला दुचाकीचालकाने धडक दिल्याची घटना घडली आहे. या धडकेत उरुळी कांचन येथील युवक गंभीर जखमी झाला असून दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
साहेबआण्णा विठ्ठल आलूरे (वय- 35, रा. मदारानी पराग, ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर जालिंदर शेंडगे (वय- 45, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साहेबअण्णा आलोरे हे सोलापूरच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील इरिगेशन कॉलनी या ठिकाणी आले असता त्याचवेळी शेंडगे हे महामार्ग ओलांडत होते. यावेळी आलोरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्ता ओलांडत असलेले शेंडगे यांना जबर धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी कस्तुरी रुग्णवाहिका लाईफ केअर या रुग्णवाहिकेशी संपर्क साधून दोघांना उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचारादरम्यान दुचाकीचालक आलोरे यांचा मृत्यू झाला असून शेंडगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
View this post on Instagram