लोणी काळभोर : उर्मी फर्टीलिटी सेंटर (आय.व्ही.एफ.) हे माननीय राहुल कराड यांच्या मातोश्री (कै.) उर्मीला विश्वनाथ कराड यांच्या नावावरून सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील ज्या महिलांना वंध्यत्वावर महागडे उपचार घेणे शक्य होत नाही, अशा रुग्णांसाठी माफक दरात आय.व्ही.एफ. उपचार सुविधा उर्मी फर्टीलिटी सेंटरच्या माध्यमातून विश्वराज हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आली आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी येथे उपचार करीत आहेत. माफक दरात उच्च दर्जाचे तसेच आधुनिक उपचार येथे मिळत असल्याने, शहरी भागातील रुग्णसुद्धा उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये येत आहेत. रुग्ण आणि डॉक्टर यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे कार्य विश्वराज हॉस्पिटल मागील ७ वर्षे करत आहे. वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त असलेल्या दाम्पत्यांसाठी उर्मी फर्टीलिटी सेंटर ही नवीन आशा ठरेल, असा विश्वास माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांनी व्यक्त केला.
लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उर्मी फर्टीलिटी सेंटरचे (आय.व्ही.एफ) महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
विश्वराज हॉस्पिटलमधील “उर्मी फर्टीलिटी सेंटर’चे (आय.व्ही.एफ) उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना तटकरे म्हणाल्या की, आजकालच्या जीवनशैलीमुळे तसेच ताणतणावांमुळे नवदाम्पत्यांना गर्भधारणेसाठी अडचणी निर्माण होत आहेत. (Loni Kalbhor) अशा रुग्णांच्या आयुष्यातील या सर्वांत आनंदी क्षणासाठी उर्मी फर्टीलिटी सेंटर (आय.व्ही.एफ) कल्पवृक्ष ठरेल.
उर्मी फर्टीलिटी सेंटर हे नामवंत डॉ. आशिष काळे व डॉ. अश्विनी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, डॉ. काळे दाम्पत्याच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ रूग्णांना माफक दरात उपलब्ध होत असल्याबद्दल कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांनी समाधान व्यक्त केले. माफक शुल्कामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा देणारे विश्वराज हॉस्पिटल अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहे. (Loni Kalbhor) मागील ७ वर्षांत विश्वराज हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरी, मूत्रपिंड प्रत्यारोपण, वंध्यत्व केंद्र, अशा सुविधांमुळेच महाराष्ट्रातून रुग्ण येथे उपचारासाठी पोहोचत आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत विश्वराज हॉस्पिटलने अंगिकारले आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.
या वेळी डॉ. अदिती कराड यांनी रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला. संचालिका डॉ. कराड म्हणाल्या की, या हॉस्पिटलमध्ये आता किडनी ट्रान्सप्लांटसारखे मोठे उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गालगत हे हॉस्पिटल असून, गंभीर अपघातातील पीडित रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. कोणीही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये, अशी भूमिका आहे. (Loni Kalbhor)
शहरी-ग्रामीण किंवा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव उपचारावेळी केला जात नाही. ‘विश्वराज’ने तत्काळ जीव वाचवणारे आपत्कालीन उपचार देऊन हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघातातील रुग्ण तसेच गर्भवती महिलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. पूर्वी गंभीर रूग्णांना आपत्कालीन उपचारांसाठी हडपसरला जावे लागत असे. ती सुविधा आता लोणीकाळभोरमध्ये ‘विश्वराज’ने उपलब्ध करून दिली आहे. आभार प्रदर्शन विश्वराज हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संतोष पवार आणि महाव्यवस्थापक सुधीर उत्तम यांनी केले.