Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : विश्वराज हॉस्पिटलमध्ये लवकरच रोबोटिक तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया होतील; डॉ. अदिती कराड यांचे आश्वासन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 13 October 2023, 16:02

Loni Kalbhor : लोणी काळभोर : माफक शुल्कामध्ये दर्जेदार आणि परवडणारे उपचार पुरवत असल्यामुळे पूर्व हवेलीतील विश्वराज हॉस्पिटलने अल्पावधीतच पूर्व हवेलीसह राज्यात नावलौकिक मिळविला आहे. बायपास सर्जरी, मूत्रपिंड प्रत्यारोपण, वंध्यत्व केंद्र, अशा सुविधांमुळेच महाराष्ट्रातून विश्वराजपर्यंत रुग्ण उपचारासाठी पोहोचत आहेत. माफक शुल्कामध्ये उत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत विश्वराज हॉस्पिटलने अंगिकारले आहे. लवकरच रुग्णालयात अद्ययावत सेवांसोबतच रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड यांनी दिले.

रूग्णांशी मनमोकळा संवाद

लोणी काळभोरमधील (ता. हवेली) विश्वराज हॉस्पिटलमध्ये आज संचालिका डॉ. अदिती कराड यांनी रुग्णांशी संवाद साधला. डॉ. कराड म्हणाल्या की, मागील सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या हॉस्पिटलमध्ये आता किडनी ट्रान्सप्लान्टसारखे मोठे उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गालगत हे हॉस्पिटल असून, गंभीर अपघातातील पीडित रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. (Loni Kalbhor) कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये, अशी भूमिका आहे. रुग्णांनी दाखविलेल्या विश्वासामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. शहरी-ग्रामीण किंवा गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव उपचारावेळी केला जात नाही. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून, वैद्यकीय तज्ज्ञ मंडळी उपचार करीत आहेत. पीडित रुग्णांना व्याधीपासून आराम देण्यात त्यांना समाधान वाटत आहे. ग्रामीण नव्हे, तर शहरी भागातील रुग्णसुद्धा उपचारासाठी विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. एवढा मोठा विश्वास देण्याचे काम वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून दिला जात आहे.

डॉ. कराड म्हणाल्या पुढे की, विश्वराजने तत्काळ जीव वाचवणारे आपत्कालीन उपचार देऊन हृदयविकाराचा झटका, गंभीर अपघातातील रुग्ण तसेच गर्भवती महिलांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांचा जीव वाचवला आहे. पूर्वी इमर्जन्सी पॉईंट्सना आपत्कालीन उपचारांसाठी हडपसरला जावे लागायचे, ती सुविधा आता लोणीकाळभोरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. (Loni Kalbhor) लवकरच रुग्णालयात अद्ययावत सेवांसोबतच रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात येतील.

उर्मी फर्टीलिटी सेंटर हे राहुल कराड यांच्या स्वर्गवासी मातोश्री उर्मीला विश्वनाथ कराड यांच्या नावाने सुरु करण्यात आले आहे. (Loni Kalbhor) ग्रामीण भागातील सर्व महिलांना ज्यांना व्यंध्यत्वावर महागडे उपचार घेणे शक्य नाही, अशा रुग्णांना माफक दरात आयव्हीएफची उपचार सुविधा उर्मी फर्टीलिटी सेंटरच्या माध्यमातून विश्वराज हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

 

राहुल कराड यांनी मनोगतात सांगितले की, या सेंटरचे नाव आमच्या मातोश्रींच्या नावाने प्रेरीत आहे. हॉस्पिटलने कमी वेळात रूग्णांचा विश्वास संपादन केला आहे. (Loni Kalbhor) विश्वराज हॉस्पिटल फक्त रोग उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिबंधासाठी सुद्धा प्रयत्नशील आहे. सर्वच दांम्पत्यांसाठी उर्मी सेंटर हे नवीन आशा ठरेल.

अदिती सुनील तटकरे यांनी याप्रसंगी नमूद केले की, आजकालच्या जीवनशैलीमुळे तसेच ताणतणावामुळे नवदाम्पत्यांना गर्भधारणेसाठी अडचणी निर्माण होत आहेत. उर्मी फेर्टीलिटी सेंटर अशा दाम्पत्यांसाठी एक नवीन आशा बनेल. तसेच त्यांच्या या सर्वांत आनंदी क्षणासाठी उर्मी सेंटर त्यांना मदत करेल. (Loni Kalbhor) याप्रसंगी आदिती तटकरे यांनी, मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंती केली.

आभार प्रदर्शन विश्वराज हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संतोष पवार आणि जनरल मॅनेजर सुधीर उत्तम यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी येथील मुक्ताई मेमोरिअल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश

Loni kalbhor News : लोणी काळभोर आठवडे बाजारातील पत्रा शेड पाडून, त्या ठिकाणी व्यावसायिक गाळे बांधण्यास बहुसंख्य ग्रामस्थांचा विरोध- प्रशांत काळभोर यांचा दावा.

Loni Kalbhor News : डॉक्टरांमध्ये सक्षमता राखण्यासाठी सतत वैद्यकीय शिक्षण गरजेचे; डॉ. अदिती कराड यांचे प्रतिपादन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ओल्ड मंक’ प्रेमींचा पुन्हा हिरमोड होणार? बंदी हटवण्याबाबत हालचाली; न्यायालयातून मोठी अपडेट

Wednesday, 2 September 2026, 19:16

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38
Next Post

Loni Kalbhor : वंध्यत्वाने त्रस्त दाम्पत्यांसाठी उर्मी फर्टीलिटी सेंटर ही नवीन आशा ठरेल; राहुल कराड यांचा विश्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp