लोणी काळभोर, (पुणे) : कुंजीरवाडी हद्दीत सुरू असलेल्या बेट परिसरातील जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत 25 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोकड, थार, क्रेटा व इतर जुगाराचे साहित्य यांचा समावेश आहे. या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली असून, दोन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. हि कारवाई रविवारी (ता. 23) सायंकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास केली आहे.
उमेश राखपसारे, पांडुरंग निवृत्ती राखपसरे, अक्षय राजेंद्र चौधरी, शाम वामन गायकवाड, ऋतिक राजेंद्र जाधव, देवराम ज्ञानोबा गायकवाड, रोहित कांबळे व इतर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार आणि पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.