Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर व कोलवडी भागातील नामांकित कंपन्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवेली मैदानात उतरली असून याबाबत नामांकित कंपन्यांना निवेदन दिले आहे. अशी माहिती हवेली तालुका संघटक काका गायकवाड यांनी दिली. (Employ local Bhoomiputras in reputed companies in Theur and Kolwadi areas; MNS demand..!)
नामांकित कंपन्यांना निवेदन
स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्या नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्थानिक भूमिपुत्राना नोकरी देण्यापासून डावलले जात असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. (Loni Kalbhor News) हा भूमिपुत्रांवर होत असलेला अन्याय पाहून स्थानिक भूमिपुत्रांसाठी पुढाकार घेऊन त्यांनी स्थानिक कंपन्यांना निवेदन दिले आहे. ८० टक्के स्थानिक भूमिपत्रांना प्राधान्य देण्यात यावे, असे काका गायकवाड यांनी मत व्यक्त केले.
यावेळी मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, पुणे मनसे विधी जिल्हा अध्यक्ष राहुल कदम, उपविभाग अध्यक्ष प्रकाश जमधडे, पै चेतन चौधरी, अनिरुद्ध मराठे, बालाजी पाटील, सतीश वेताळ, सागर भिसे, दया जाधव, (Loni Kalbhor News) स्वप्नराज खेडेकर, महेंद्र चौधरी, दर्शन कुंजीर, संदीप चोरघडे, आयुष गुप्ता, मनसे थेऊर शाखा अध्यक्ष सुहास कुंजीर, कोलवडी शाखाअध्यक्ष सागर गायकवाड, भरत सावंत, पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथे महेश नवमीच्या दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न..!