Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊर येथील यशवंत कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सभासद शेतक-यांनी घेतला पुढाकार ; आगामी निवडणूक बिनविरोध करण्याचा सभासदांचा आग्रह..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 1 June 2023, 17:02

Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी सभासद शेतक-यांनी पुढाकार घेतला असून यासाठी आतापर्यंत चार गटांमध्ये चार बैठका झाल्या आहेत. उर्वरित दोन गटांमध्ये ही लवकरच बैठका होणार असून कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करावी असाही सभासदांचा आग्रह आहे. (Member farmers took initiative for revival of Yashwant factory at Theur; Members urged to hold the upcoming election uncontested.)

माजी संचालक पांडुरंग काळे यांचा पुढाकार

कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला भेट दिली होती. त्या नंतर ११ मार्च २०२३ रोजी एक विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. (Theur News) या सभेत यशवंत सुरू करण्यासाठी कारखान्याची कोणतीही मालमत्ता भाड्याने न देता अथवा न विकता तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने करावा असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. त्यानुसार साखर आयुक्तांना निवडणूक खर्चासाठी ३० लाख रुपयांचा धनादेश कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांच्या सहका-यांनी दिला आहे.

यशवंतच्या ताळेबंदात रक्कम शिल्लक नसल्याने निवडणूकीसाठी शेतक-यांनी निधी उभारावा या आवाहनानुसार सभासदांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. निवडणूक होईपर्यंत सदर रक्कम डिपॉझिट म्हणून राहणार आहे. कारखाना सभासदांच्या ताब्यात गेलेनंतर किरकोळ व्याजासह नवीन संचालक मंडळाने ही रक्कम परत करण्याचे ठरले आहे. (Theur News) आता निवडणूक प्राधिकरणास पत्र देऊन निवडणूक कार्यवाही सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठवण्यात येणार आहे.

 

आगामी काळात यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार असून त्यानंतर सभासद नियुक्त संचालक मंडळाने कारभार हाती घेईल. त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. यशवंत सहकारी साखर कारखाना आर्थिक अनियमितेमुळे बारा वर्षांपूर्वी बंद पडला. हा कारखाना चालू व्हावा यासाठी अनेक प्रयत्न झाले. (Theur News) अनेक निवडणुका लढल्या गेल्या, परंतु कारखाना आजपर्यंत चालू होऊ शकला नाही. हा कारखाना चालू व्हावा यासाठी प्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठका घेण्यास सुरुवात केली असून यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही चित्र दिसत आहे.

नुकतीच गट क्रमांक चार मधील सभासदांची बैठक पार पडली. मांजरी बुद्रुक येथील के के घुले विद्यालयात कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात गट क्र. ४ (फुरसुंगी, मांजरी व हडपसर) मधील सभासदांची बैठक पार पडली. (Theur News) यावेळी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात एकमताने संमती देण्यात आली. माजी संचालक पांडुरंग काळे यांनी निवडणूक घेण्यासंदर्भात तीस लाख रुपयांचा जो निधी कारखाना खात्यामध्ये जमा केला.

त्या संदर्भात सर्व उपस्थित सभासदांनी त्यांचे आभार मानले. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात जो अतिरिक्त निधी लागणार आहे. त्या संदर्भात चर्चा झाल्यानंतर लगेच मांजरीचे माजी सरपंच शिवराज घुले, व मल्हार कुंजीर यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश पांडुरंग काळे यांच्याकडे सुपूर्द केला.(Theur News)  दिलीप तुपे, सुरेश घुले, राजीव शिवाजीराव घुले, अॅड. शहाजी मगर, निलेश मगर, प्रदीप मगर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे जाहीर केले तर संपूर्ण फुरसुंगी गावाच्या वतीने तीन लाख असा एकूण ११ लाख रुपयांच्या निधी देण्यात येईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

दरम्यान, या बैठकीस गोपाळ म्हस्के, अनिल तुपे, नंदू घुले, शिवाजी कामठे, गेनबा खुटवड, दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, राहुल चोरघडे, युवराज शेवाळे, मधुकर घुले, रमेश ढोरे, डॉ. शिवदीप उंद्रे, शैलेश बेल्हेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन रंगनाथ कड यांनी (Theur News) तर उपस्थितांचे आभार लोणी काळभोरचे माजी उपसरपंच अण्णासाहेब गणपत काळभोर यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Theur News : थेऊर येथील कुंजीर पाणीपुरवठा योजेनेचे अध्यक्ष सुखराज कुंजीर यांना मातृशोक..

Theur News : थेऊरच्या ऐश्वर्या डोखळे – कुंजीर बनल्या नगररचना अधिकारी

Theur News : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58
Next Post

Manchar News : वाढदिवस बेतला जीवावर..! कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुंबई येथील दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ; पुणे जिल्ह्यातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.