Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 17:33

फुरसुंगी, ता. ३ : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या मोबाईलमधील ‘Keep Notes’ अॅपमध्ये आढळलेल्या मजकुरानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

वृषाली भिमराव आरडे (लग्नानंतर वृषाली रोहित घोडे, वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. रोहित मच्छिंद्र घोडे आणि तृप्ती वाकचौरे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मृत विवाहितेची आई लक्ष्मी भिमराव आरडे (रा. शहा, ता. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली भिमराव आरडे (लग्नानंतर वृषाली रोहित घोडे, वय २५) हिने सप्टेंबर २०२१ मध्ये रोहित मच्छिंद्र घोडे याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती येथे वास्तव्यानंतर दोघे पुण्यात वास्तव्यास आले होते. मागील दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील वैष्णव सिटी परिसरात राहत होते. वृषालीचा पती रोहित घोडे हा डी-मार्टमध्ये कार्यरत असून त्याच्यासोबत काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे हिच्याशी त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय वृषालीला आला होता.

यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तसेच रोहित घोडे याच्याकडून शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततच्या वादामुळे वृषाली काही दिवस नाशिक येथे भावाकडे गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी समेट घडवून आणत १३ जून रोजी तिला पुन्हा पतीकडे सोडले. त्यावेळीही रोहितला कथित संबंध संपवून संसाराकडे लक्ष देण्याची समज दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, त्यानंतरही वाद कायम राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

२७ जून रोजी वृषालीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती शेजाऱ्यांनी तिच्या आईला दिली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळफासामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मृत वृषालीचा मोबाईल तपासताना तिच्या भावाला ‘Keep Notes’ अॅपमध्ये लिहिलेली नोंद आढळून आली. त्यामध्ये आपल्या मृत्यूस पती रोहित घोडे आणि त्याचे तृप्ती वाकचौरे हिच्यासोबतचे कथित विवाहबाह्य संबंध, तसेच त्यांच्याकडून होणारा मानसिक व शारीरिक त्रास कारणीभूत असल्याचा उल्लेख असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलिसांनी रोहित मच्छिंद्र घोडे आणि तृप्ती वाकचौरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आजचा गुरुवार ठरणार गेमचेंजर! त्रिग्रह योगाचा 12 राशींवर मोठा प्रभाव; तुमच्या राशीत काय घडणार?

Thursday, 6 August 2026, 7:35

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06
Next Post

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.