Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 26 September 2026, 12:19

हडपसर: हडपसर-माळवाडी येथील शिवनेरी कामधेनू इस्टेटमधील दुकानाच्या व्यवहारात बनावट समझोता करार तयार करून त्याचा वापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कराराच्या आधारे खोटा गुन्हा दाखल व्हावा, बदनामी व्हावी आणि बेकायदेशीर फायदा मिळावा, या उद्देशाने कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात एका पत्रकारासह सातहून अधिक जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केदार माधव बिडवई, गजानन बिडवई, तुषार सुदाम पायगुडे (पत्रकार), विनोद रमेश कुलकर्णी, बनावट स्वाक्षरी करणारा इसम, जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर उपलब्ध करून देणारा स्टॅम्प विक्रेता तसेच इतर साथीदारांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याप्रकरणी राजेंद्र केशवराव मोकाशी (वय 59, रा. ललिता महाल सोसायटी, बाणेर रोड, पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोकाशी यांचा मुलगा ज्योतिरादित्य राजेंद्र मोकाशी याच्या नावावर 25 मे 2022 रोजी हडपसर-माळवाडी येथील शिवनेरी कामधेनू इस्टेटमधील सुमारे 235 चौरस फुटांचे दुकान 18 लाख रुपयांना खरेदी करण्यात आले. खरेदीपूर्वी पेपर नोटीस देऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तसेच संपूर्ण आर्थिक व्यवहार बँकेच्या धनादेशाद्वारे झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, मे 2025 मध्ये केदार माधव बिडवई यांनी मोकाशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध सावकारी व्यवहारातून दुकान खरेदी केल्याचा तसेच दमदाटी केल्याचा आरोप करत पुणे पोलिस आयुक्तांकडे अर्ज केला. या अर्जासोबत ज्योतिरादित्य मोकाशी आणि केदार बिडवई यांच्यात 2022 मध्ये समझोता झाल्याचे दर्शविणारा कथित करार सादर करण्यात आला होता. या अर्जाची गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2 कडून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळले नसल्याने संबंधित अर्ज सरकार दप्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर मोकाशी यांनी माहितीच्या अधिकारातून या चौकशीची कागदपत्रे मिळविली. कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर कथित समझोता करार बनावट असल्याचा संशय आला. त्यानंतर मोकाशी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

 

गुन्हे शाखा युनिट-7 कडून करण्यात आलेल्या चौकशीत कथित समझोता करार बनावट तयार करण्यात आल्याचे आणि त्यावरील ज्योतिरादित्य मोकाशी यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, या कथित करारासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर 2025 मध्ये वापरला गेला असताना तो 2022 सालचा असल्याचे समोर आले. याशिवाय पोलिस आयुक्तांकडे कथित कराराची मूळ प्रत न देता केवळ झेरॉक्स प्रत सादर करण्यात आली. मूळ कागदपत्र जाणीवपूर्वक स्वतःकडे ठेवून त्यातील कथित बनावटपणा उघड होऊ नये, असा आरोपही फिर्यादी मोकाशी यांनी केला आहे.

दरम्यान, केदार बिडवई आणि इतर संबंधित व्यक्तींनी संगनमत करून बनावट समझोता करार तयार केला व त्याचा वापर केला. या माध्यमातून मोकाशी आणि त्यांच्या मुलाविरुद्ध खोटा गुन्हा दाखल व्हावा, त्यांची बदनामी व्हावी आणि स्वतःला बेकायदेशीर फायदा मिळावा, या उद्देशाने कट रचल्याचा आरोप फिर्यादी मोकाशी यांनी केला आहे. जुन्या तारखेचा स्टॅम्प पेपर उपलब्ध करून देणाऱ्या स्टॅम्प विक्रेत्याचाही या प्रकारात सहभाग आहे. अशी फिर्याद मोकाशी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 61, 335, 336, 338, 238, 248 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) हनुमंत गायकवाड करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp