Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानाचा पत्रा कापून दुकानातील तांब्याच्या तारांची चोरी केली. तसेच ४५ लाख रुपयांच्या फर्निचरच्या दुकानाला आग लावून नुकसान टाकणाऱ्या अट्टल दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Local Crimes 6 cases of theft revealed by rural police; Shackles to both..)
पुणे , नगर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस
चीच्या उर्फ नसरीन हीरामण भोसले (वय २२, रा. कोराळे, ता. बारामती), कुलमुख उर्फ कामदेव शिवाजी काळे(वय २०, रा चितेगांव पठाणखेडा, जि. औरंगाबाद मुळ रा. वायरलेसफाटा गिरीम, ता. दौड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.(Loni Kalbhor) त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीसह नगर जिल्ह्यात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला गुन्हा गंभीर असल्याने सदर घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस तपास करित असताना संशयित आरोपी नसरूद्दीन भोसले (Loni Kalbhor) हा केडगाव चौफुला येथील पुलाखाली थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी तत्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पुलाखाली दोघेजण उभे असलेले दिसून आले. त्यांच्याकडे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव वरीलप्रमाणे सांगितले.(Loni Kalbhor) तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दौंड, यवत, बारामती तालुका, वडगाव निंबाळकर, तसेच नगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर चोरीचा माल हा औरंगाबाद व दौंड येथे भंगारात विक्री केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिसांनी यवत पोलिसांकडे अधिक तपासासाठी दिले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजय घुले, असिफ शेख, स्वप्निल अहीवळे, अभिजीत एकशिंगे, मुकुंद कदम यांच्या पथकाने केली.