Loni Kalbhor लोणी काळभोर : सुख देणाऱ्या आणि दुःखाचे हरण करणाऱ्या गणरायाला हिंदू धर्मात वैदिक काळापासून मानाचे स्थान आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात गणेशाच्या पूजेने होते. म्हणूनच ‘श्रीगणेशा करणे’ म्हणजे कोणत्याही कार्याची सुरूवात करणे, असे म्हटले जाते. श्री गणपती हे भारतीय संस्कृतीतील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच गौरी गणपती सणाला भारतात फार महत्त्व आहे. लहान-थोरांना आपलासा करणारा हा सण आहे. गणेशोत्सव हा दहा ते अकरा दिवसांचा असतो; पण त्याचा उत्साह महिनाभर आधीच सुरु होतो. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ गणपती मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षी गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते.
मंडळ राबविते विविध समाजोपयोगी उपक्रम
गणेशजी हे बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. त्याच्या कृपेने जीवनात शुभता येते, माणसाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना शुभ आशीर्वाद देतो. (Loni Kalbhor) याच हेतूने श्रीमंत अंबरनाथ गणपती मंडळाची स्थापना १९६५ साली झाली आहे. गणेशोत्सव साजरे करण्याचे हे मंडळाचे ५९ वे वर्ष आहे. या कालावधीत मंडळाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाने विनायक चतुर्थीच्या एक दिवस आधीच बाप्पांची मूर्ती आणली. त्यानंतर बाप्पांची वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली. या वेळी मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्तानुसार गणपतीची पूजा-अर्चा करून, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गणेशोत्सवादरम्यान हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यामध्ये बनविण्यात येणारे चलचित्र सामाजिक संदेश देते. तसेच रात्री वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. (Loni Kalbhor) कधी वकृत्व स्पर्धा, कनृत्य, नाटक तर एक दिवस खेळ आणि गणपतीच्या शेवटच्या दिवशी सर्व विजेत्यांना बक्षीसे दिली जातात.
दरम्यान, यावर्षी मंडळाने गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या अवतीभोवती सुंदर विद्युत रोषणाई केली आहे. तसेच मंडळाच्या कार्यकत्यांनी भिशीच्या माध्यमातून पैसे गोळा करून, गणरायासाठी तब्बल ३ किलोचे सोन्याचे दागिने बनविले आहेत. (Loni Kalbhor) यामध्ये गणरायाला मुकूट, जास्वंदीचा हार, दूर्वांचा हार, सोंडपट्टी, जानवे, कमरपट्टा, छत्रे, कंगण, कुंडल, मोदकाची चळ, तोडे, बाजुबंद, पंचारती, पंचपात्र, नंदादीप, बाप्पांचे उपरणे, मोदक कंठी, मोत्याची कंठी या दागिन्यांचा समावेश आहे.
या मंडळाचे कार्यकर्ते लखन पवार, संदीप भोसले, रोहित गिरी, ऋषिकेश आगळे, प्रीतम पाटील मोहन गायकवाड, आनंद शेळके, निलेश काळभोर, मयूर काळभोर व इतर सर्वजण खूप मेहनत घेऊन गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.
गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी मंडळ जय्यत तयारी करते. अनंत चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक वाद्ये, विविध कला व ढोलताशांच्या गजरात गावातून बाप्पांची मिरवणूक काढतात. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, अशा घोषणा देत बाप्पाला निरोप देतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..
Loni Kalbhor : थेऊरसह मोरगाव व सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीची माहिती वेबसाईटवर मिळणार