Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : लोणीकाळभोरचे अंबरनाथ गणेश मंडळ देतेय चलचित्रातून सामाजिक संदेश

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 24 September 2023, 16:02

Loni Kalbhor लोणी काळभोर  : सुख देणाऱ्या आणि दुःखाचे हरण करणाऱ्या गणरायाला हिंदू धर्मात वैदिक काळापासून मानाचे स्थान आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात गणेशाच्या पूजेने होते. म्हणूनच ‘श्रीगणेशा करणे’ म्हणजे कोणत्याही कार्याची सुरूवात करणे, असे म्हटले जाते. श्री गणपती हे भारतीय संस्कृतीतील मांगल्याचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच गौरी गणपती सणाला भारतात फार महत्त्व आहे. लहान-थोरांना आपलासा करणारा हा सण आहे. गणेशोत्सव हा दहा ते अकरा दिवसांचा असतो; पण त्याचा उत्साह महिनाभर आधीच सुरु होतो. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील श्रीमंत अंबरनाथ गणपती मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून दरवर्षी गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते.

मंडळ राबविते विविध समाजोपयोगी उपक्रम

गणेशजी हे बुद्धीची आणि शुभाची देवता आहे. त्याच्या कृपेने जीवनात शुभता येते, माणसाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत गणेश जयंतीच्या दिवशी श्रीगणेशाची आराधना केल्याने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तांना शुभ आशीर्वाद देतो. (Loni Kalbhor) याच हेतूने श्रीमंत अंबरनाथ गणपती मंडळाची स्थापना १९६५ साली झाली आहे. गणेशोत्सव साजरे करण्याचे हे मंडळाचे ५९ वे वर्ष आहे. या कालावधीत मंडळाने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळाने विनायक चतुर्थीच्या एक दिवस आधीच बाप्पांची मूर्ती आणली. त्यानंतर बाप्पांची वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली. या वेळी मंडळाच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्तानुसार गणपतीची पूजा-अर्चा करून, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

 

गणेशोत्सवादरम्यान हे मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. यामध्ये बनविण्यात येणारे चलचित्र सामाजिक संदेश देते. तसेच रात्री वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. (Loni Kalbhor) कधी वकृत्व स्पर्धा, कनृत्य, नाटक तर एक दिवस खेळ आणि गणपतीच्या शेवटच्या दिवशी सर्व विजेत्यांना बक्षीसे दिली जातात.

दरम्यान, यावर्षी मंडळाने गणेशोत्सवानिमित्त गणपतीच्या अवतीभोवती सुंदर विद्युत रोषणाई केली आहे. तसेच मंडळाच्या कार्यकत्यांनी भिशीच्या माध्यमातून पैसे गोळा करून, गणरायासाठी तब्बल ३ किलोचे सोन्याचे दागिने बनविले आहेत. (Loni Kalbhor) यामध्ये गणरायाला मुकूट, जास्वंदीचा हार, दूर्वांचा हार, सोंडपट्टी, जानवे, कमरपट्टा, छत्रे, कंगण, कुंडल, मोदकाची चळ, तोडे, बाजुबंद, पंचारती, पंचपात्र, नंदादीप, बाप्पांचे उपरणे, मोदक कंठी, मोत्याची कंठी या दागिन्यांचा समावेश आहे.

या मंडळाचे कार्यकर्ते लखन पवार, संदीप भोसले, रोहित गिरी, ऋषिकेश आगळे, प्रीतम पाटील मोहन गायकवाड, आनंद शेळके, निलेश काळभोर, मयूर काळभोर व इतर सर्वजण खूप मेहनत घेऊन गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात.

गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी बाप्पाला वाजतगाजत निरोप देण्यासाठी मंडळ जय्यत तयारी करते. अनंत चतुर्थीच्या दिवशी पारंपरिक वाद्ये, विविध कला व ढोलताशांच्या गजरात गावातून बाप्पांची मिरवणूक काढतात. त्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, अशा घोषणा देत बाप्पाला निरोप देतात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील निशांत काळभोरने जिल्हास्तरीय ‘कुस्ती’ स्पर्धेत पटकावले सिल्वर पदक..

Loni Kalbhor News : एंजल हायस्कूलच्या यश काळभोर याची विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेसाठी निवड..

Loni Kalbhor : थेऊरसह मोरगाव व सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीची माहिती वेबसाईटवर मिळणार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

Pimpri News : "रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलेले आणि शिकविणारे यांचे गोत्र म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील!" - पद्मश्री गिरीश प्रभुणे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.