Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 July 2026, 19:26

हडपसर, ता. ३ : पिसोळी (ता. हवेली) परिसरातील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर काळेपडळ पोलिसांनी बुधवारी (ता.1) मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 75 लाख 80 हजार 739 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालामध्ये हुक्का साहित्य, तंबाखूजन्य फ्लेवर, महागडे मोबाईल, फॉर्च्युनर, मर्सिडीजसह तीन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे.

सुमित ओसवाल, प्रणव मुथा, जैद शेख, सोहेल सय्यद, फहीम सय्यद, आशरफ मोमीन, फरहान शेख, पवन मोडक, सागर मोडक, आथर्व कुदळे, साद सय्यद आणि अनिस सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीस अंमलदार महादेव बालाजी शिंदे यांनी याप्रकरणी सरकारतर्फे काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलिसांचे तपास पथक अवैध धंद्यांविरोधात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत पिसोळीतील फार्महाऊसमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी पंचांसह रात्री सुमारे 10.15 वाजता फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथे अनेक ग्राहक हुक्का ओढताना आढळले. पोलिसांना पाहताच काही जण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी तत्काळ सर्वांना ताब्यात घेतले.

 

तपासादरम्यान फार्महाऊसमध्ये ग्राहकांसाठी टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करून पैसे घेऊन हुक्का पुरविला जात असल्याचे उघड झाले. चौकशीत फार्महाऊसचा व्यवस्थापक अनिस मनाफ सय्यद याने एका हुक्का पॉटसाठी 1 हजार २०० आकारले जात असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आठ काचेचे हुक्का पॉट, तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवरचे डबे, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल, फॉर्च्युनर, मर्सिडीज-बेंझ, महिंद्रा कंपनीची चारचाकी वाहने तसेच दोन दुचाकी असा एकूण 75.80 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले हुक्का फ्लेवर रासायनिक विश्लेषणासाठी (सीए) पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सुमित ओसवाल, प्रणव मुथा, जैद शेख, सोहेल सय्यद, फहीम सय्यद, आशरफ मोमीन, फरहान शेख, पवन मोडक, सागर मोडक, आथर्व कुदळे, साद सय्यद आणि अनिस सय्यद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 मधील कलम 4-अ व 21-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिसांच्या तपास पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

Jouez en toute sûreté et sérénité sur Duffspin Casino pour la France

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.