Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 3 July 2026, 19:18

पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी भेसळीविरोधातील कारवाईचा वेग वाढवला आहे. विविध हॉटेल्स आणि अन्नपदार्थांची तपासणी केल्यानंतर आता त्यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी राज्यभरात दूध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांसाठी 8 नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.

मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हे नियम दूध संकलन केंद्र, बल्क मिल्क कूलर, चिलिंग सेंटर, डेअरी, दूध प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते अशा संपूर्ण पुरवठा साखळीवर लागू असतील.

नव्या नियमांनुसार कच्च्या दुधाची विक्री करताना प्रत्येक भांड्यावर “RAW MILK” असा स्पष्ट उल्लेख करणे आणि “हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे” अशी सूचना देणे बंधनकारक असेल.

पाश्चराइज्ड किंवा उष्णताप्रक्रिया केलेले दूध केवळ सीलबंद, लेबलयुक्त आणि छेडछाड झाल्याचे स्पष्टपणे समजू शकेल अशा सुरक्षित पॅकेजिंगमध्येच विक्री करता येणार आहे.

 

दूध संकलन, वाहतूक, साठवणूक आणि हाताळणीसाठी फूड ग्रेड स्टेनलेस स्टील किंवा मान्यताप्राप्त साहित्याची पात्रे वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दूध योग्य तापमानात ठेवणे, शीतसाखळीचे पालन करणे आणि तापमानाच्या नोंदी ठेवणे आवश्यक राहणार आहे.

याशिवाय, दूध कोणत्या उत्पादकाकडून आले, त्याचे संकलन कधी झाले, वाहतूक कोणत्या मार्गाने झाली आणि अंतिम विक्रीपर्यंतचा संपूर्ण तपशील नोंदवून ठेवण्यासाठी ट्रेसेबिलिटी प्रणाली लागू करण्यात आली आहे.

अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वैध वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील. तसेच अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली (FSMS), HACCP तत्त्वे आणि FoSTaC प्रशिक्षित पर्यवेक्षकांची अंमलबजावणी करणेही संबंधित अन्न व्यवसायांची जबाबदारी असेल.

दुधातील भेसळ रोखणे, अन्न सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार दूध उपलब्ध करून देणे हा या नव्या नियमांचा प्रमुख उद्देश असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आंबेगाव खून प्रकरणातील आरोपीला 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Saturday, 29 August 2026, 13:13

निकाल आता उलटणार! 2024 नंतर महाराष्ट्रात बदललं राजकीय चित्र; नव्या सर्व्हेत ‘या’ पक्षाने घेतली आघाडी

Saturday, 29 August 2026, 12:59

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Saturday, 29 August 2026, 12:26

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

Saturday, 29 August 2026, 12:22

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

Saturday, 29 August 2026, 12:18

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45
Next Post

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp