Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी व मुलावर गुन्हा दाखल; संगनमताने घातला १०० जणांना २५ कोटींचा गंडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 14:51

Breaking News : पुणे : भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी व त्यांच्या मुलाने जवळपास १०० जणांना २५ कोटी रुपयांना गंडा घातल्याचे धक्कादायक वास्तव नुकतेच उघडकीस आले आहे. स्वतःच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष त्याने ग्राहकांना दाखविले. फिर्यादींनी त्यांच्याकडे गुंतविलेले पैसे परत मागितले असता, तुला तुझ्या जीवाची भिती वगैरे वाटत नाही काय, अशी धमकी दिली. याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांनी पुढे येऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या आहेत. याप्रकरणी उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) आणि त्यांचा मुलगा मयुरेश उदय जोशी (वय ४६, रा. पानमळा) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंगेश जगदिश खरे (रा. सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जुलै २०२१ ते ६ डिसेंबर २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी शुभदा जोशी या नगरसेविका होत्या. त्यांचा मुलगा मयुरेश जोशी याला गॅस एजन्सी मिळाली. (Breaking News) त्याच्या श्रीराम गॅस एजन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याचे आमिष उदय जोशी याने दाखविले. फिर्यादी यांनी ९ लाख १० हजार रुपये तसेच त्यांच्या आईच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये असे एकूण १४ लाख १० हजार रुपये श्रीराम गॅस एजन्सीमध्ये गुंतविले.

दरम्यान, मयुरेश जोशी याने रिझर्व बँक ऑफ इंडियाची कोणतीही परवानगी नसताना वार्षिक १२ टक्के व्याजाच्या खोट्या एफडी सर्टिफिकेटस फिर्यादीला दिल्या. (Breaking News) त्यावर आजपर्यंत कोणताही परतावा न देता, फिर्यादीची १४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. त्यांनी तक्रार केल्यावर पैसे आज देतो, उद्या देतो, अशी आश्वासने तो देत होता. फिर्यादी यांच्याप्रमाणेच उदय जोशी याने अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्यापैकी फिर्यादी व अन्य ८ जणांनी पुढे येऊन तक्रारी दिल्या आहेत. जवळपास १०० जणांची २५ कोटी रुपयांवर फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे.

 

याबाबत पोलीस निरीक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : हवेलीत महसूलचा ‘गती’मान कारभार!.. तलाठ्याच्या चुकीची शेतकऱ्याला शिक्षा ; एका दिवसाच्या सातबारा दुरूस्तीसाठी ९० दिवस अन् १५ हेलपाटे…

Breaking News : वडिलांनी मुलाला दिला काम करण्याचा सल्ला; मग् मुलाने केला आई-वडिलांवर खुनी हल्ला

BIG BREAKING NEWS : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ; जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्याने सरपंचपदही धोक्यात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54
Next Post

Loni Kalbhor : लोणीकाळभोरचे अंबरनाथ गणेश मंडळ देतेय चलचित्रातून सामाजिक संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.