Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 18:54

पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात एका 80 वर्षीय वृद्ध महिलेची देखभाल करणाऱ्या महिला केअरटेकरने विश्वासघात करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या जागी हुबेहूब बनावट बांगड्या घालण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अनिता रामचंद्र सुतार (वय 45, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राजकुमार कनोत्रा हे विमाननगर येथील कोनार्क कॅम्पसमध्ये आपल्या 80 वर्षीय आईसोबत राहतात. आईच्या देखभालीसाठी त्यांनी चार महिला केअरटेकर नियुक्त केल्या होत्या. त्यापैकी अनिता सुतार ही घरात राहून वृद्ध महिलेची काळजी घेत होती.

21 मे रोजी अनितानेच अजय कनोत्रा यांना वृद्ध महिलेच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर अजय यांनी शोध घेतला, मात्र बांगडी सापडली नाही. संशय येऊ नये म्हणून त्यांनी उरलेल्या तीन बांगड्यांचे फोटो मोबाईलमध्ये जतन करून ठेवले.

काही दिवसांनी अजय कामानिमित्त बाहेर जाऊन परतल्यानंतर त्यांनी आईच्या हातातील बांगड्या पाहिल्या. त्या पूर्वीपेक्षा वेगळ्या दिसत असल्याने त्यांनी मोबाईलमधील फोटोशी तुलना केली. त्यावेळी खऱ्या सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बनावट बांगड्या घालण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

 

तपासादरम्यान पोलिसांनी चारही महिला केअरटेकरची चौकशी केली. यामध्ये अनिता सुतारच्या जबाबात विसंगती आढळल्याने तिची अधिक चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने चोरीची कबुली दिली. तिने आधी एक बांगडी चोरल्यानंतर त्याच प्रकारच्या बनावट बांगड्या तयार करून वृद्ध महिलेच्या हातात घातल्याचे समोर आले.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या सोन्याच्या बांगड्या, घरातील चांदीचे ग्लास, निरंजन असा सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लालकृष्ण अडवाणींची तब्येत बिघडली! दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल, सध्या प्रकृती कशी? वाचा

Saturday, 17 October 2026, 10:27

ना कुणाला संशय, ना कुणाला खबर! जुन्नरमध्ये पहाटेच्या वेळी उसाच्या शेतात सापडल्या गोण्या; पोलिसांनी पाहिलं अन्…

Saturday, 17 October 2026, 10:13

पुण्यात आपटा, शमी अन् आंब्याच्या फांद्या तोडल्यास 1 लाखांपर्यंत दंड? पुणे महापालिकेचा नागरिकांना स्पष्ट इशारा

Saturday, 17 October 2026, 9:58

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14
Next Post

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या "पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी..."

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp