Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 19:47

पुणे: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याची चर्चा आहे. यावर आता रुपाली चाकणकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, अशोक खरात प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर आधारित पात्र चित्रपटात दाखवायचे असल्यास संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी आपली कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशोक खरात प्रकरणानंतर आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याचेही चाकणकर यांनी म्हटले. या आरोपांमुळे आपल्या मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.

 

यासंदर्भात त्यांनी आशा मिरगे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र ती स्वीकारण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यामध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

रुपाली चाकणकर यांनी 10 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः हजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

पुणे पोलिसांचा 'सिंघम' अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.