Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 17 October 2026, 9:41

ठाणे: नवीन बाईक खरेदी करण्याची इच्छा आणि वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी पैशांची गरज, यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या वर्गमित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. मृत विद्यार्थ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी मिळवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप आहे. तब्बल 21 दिवसांच्या तपासानंतर कासारवडवली पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, 17 वर्षांच्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आझादनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे यांनी 25 सप्टेंबर रोजी आपला 10वीत शिकणारा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला. मित्र आणि नातेवाइकांकडे चौकशी करण्यासोबतच परिसरातील 80 ते 90 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, सुरुवातीला मुलाचा ठावठिकाणा लागला नाही.

तपासादरम्यान एका वर्गमित्राने दिलेली माहिती पोलिसांना संशयास्पद वाटली. बेपत्ता विद्यार्थी 24 सप्टेंबरच्या रात्री ब्रह्मांड सर्कल परिसरातून एका अनोळखी मुलासोबत पांढऱ्या ॲक्टिव्हावरून घोडबंदर रोडच्या दिशेने गेल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधून या माहितीला पुष्टी मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले.

पोलिसांच्या तपासानुसार, सोन्याची साखळी मिळवण्यासाठी दोघांनी विद्यार्थ्याला ब्रह्मांड फेज 2 परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तेथे चाकू आणि दगडाने हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर साखळी काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले. पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला.

 

आरोपींनी तपासाची दिशाभूल करण्यासाठी मृत विद्यार्थ्याचा मोबाईल बसमध्ये टाकल्याचेही पोलिसांच्या तपासात उघड झाले. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, गुन्ह्याचा संपूर्ण तपशील तपासातून स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

ना पुरावा, ना मृतदेहाचा ठाव! सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राला संपवलं; 21 दिवस पोलिसांना असा दिला गुंगारा

Saturday, 17 October 2026, 9:41

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

Saturday, 17 October 2026, 9:10

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp