पुणे: लोहगाव येथील नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता.१०) दुपारी १२ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ऑनलाईन पद्धतीने रविवारी करणार आहेत. त्यात लोहगाव विमानतळाचाही समावेश आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत लोहगाव विमानतळावर विशेष कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूरच्या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. लोहगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलसाठी ५०० कोटी रुपयांना निधी केंद्र सरकारने दिला आहे. विमातळावरून सध्या रोज १८० विमानांची ये-जा होते. नव्या टर्मिनलमुळे विमानांच्या उड्डाणांची संख्या वाढणार आहे.