Koyta Gang पुणे : पुणे शहरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत असताना आता या गॅंगचा परिणाम शहरातील लहानग्यावर पडताना दिसून येते आहे. (Koyta Gang) अशीच एक धक्कादायक घटना शहरातील मुंढवा भागातून समोर अली आहे. (Koyta Gang) अल्पवयीन मुलांनी पानपट्टी चालकाने उधारीवर सिगारेट न दिल्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. (Koyta Gang)
मुंढव्यात कोयता गँगने एका व्यावसायिकाचा खून केल्याची घटना ताजी असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून परिसरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी सीताराम साठे (वय २१,रा. मांजरी) याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आले आहे. व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठे याची मुंढवा भागातील केशवनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साठे याच्या पानपट्टीवर सिगारेट घेण्यासाठी अल्पवयीन मुले यायची. त्यांनी साठे याच्याकडून ते सिगारेट घ्यायचे. उधारीवर सिगारेट न दिल्याने अल्पवयीन मुले आणि साथीदारांनी साठे याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
koyta Gang : उत्तमनगर भागात कोयता गॅंगची पुन्हा दहशत ; चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!