Koyta Gang – पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकाचा खून करणाऱ्या कोयता गँगमधील सहा आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. (Koyta Gang) नागरिकांमधील गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी तर परिसरात शांतता रहावी अशी मागणी केली होती. (Koyta Gang) पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांची त्याच भागात धिंड काढली. (Koyta Gang)
मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता. खूनप्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली होती. मुंढवा भागातील केशवनगर परिसरात ३० एप्रिल रोजी रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी आकाश अशोक जावळे, सागर आकाश जावळे, साहिल भीमाशंकर सुतार, सनी विनायक चव्हाण, नागनाथ ऊर्फ हरी विठ्ठल पाटील, रोहित दत्तात्रय घाडगे यांना अटक करण्यात आली होती.
गायकवाड यांचा खून झाल्यानंतर मुंढवा-केशवननगर भागातील या घटनेचा निषेध करून बंद पाळला होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली होती. गायकवाड व्यावसायिक होते. त्यांच्या घराजवळ आरोपी शिवीगाळ, तसेच आरडाओरडा करत होते. आरोपींना गायकवाड यांना समजावून सांगितले. त्यानंतर आरोपी जावळे, सुतार, पाटील, घाडगे यांनी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून केशवनगर आणि मुंढवा भागात सकाळ, दुपार, संध्याकाळ पेट्रोलिंग सुरू केली आहे. तर, नाकाबंदी करून ट्रीपलसिट प्रवास करणारे, तसेच संशयास्पद वाटणाऱ्यांची चौकशी सुरू केली. रात्रीच्या वेळी हद्दीतील ब्लॅकस्पॉटची देखील पेट्रोलिंग करून तपासणी केली जात आहे.
दरम्यान, खूनाच्या घटनेनंतर परिसरातील शंभरहून अधिक सराईतांची झाडाझडती घेतली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेवढे आरोपी आहेत त्या सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडून सामाजिक शांतता भंग होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Koyta Gang : पुण्यात अल्पवयीन कोयता गँगची दहशत, उधारीवर सिगारेट न दिल्याने पानपट्टीचालकावर वार
koyta Gang : उत्तमनगर भागात कोयता गॅंगची पुन्हा दहशत ; चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!