Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत दोन मुले पाण्यात बुडाली होती. रविवारी (21) रोजी ही घटना घडली होती. भीमा नदीत दुपारी दिडच्या सुमारास पोहण्यासाठी गेली असता ही मुली बुडाली होती. दरम्यान कालपासून पाण्यात ही मुले बेपत्ता होती. त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले होते. अखेर आज दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. (Succeeded in finding bodies of two drowned boys in Bhima river in Koregaon Bhima)
दोघेही कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील
गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) व अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी पाण्यात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील ढेरंगे वस्तीतील आहेत. (Koregaon Bhima News)
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत ढेरंगे वस्तीतील पाच ते सहा मुले पोहण्यासाठी गेली होती. ही मुले पाण्यात पोहत असताना त्यातील गौरव व अनुराग अचानक गायब झाले. त्यानंतर इतर पाण्यातील मुलांनी याबाबत माहिती देण्यासाठी गावात धाव घेतली व येथील ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला. (Koregaon Bhima News) त्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत पाण्यात उतरून गौरव व अनुरागला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये गावकऱ्यांना यश आले नाही. या घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका दाखल झाले होते. घटनास्थळी दुपारी चार वाजल्यापासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात मुलांचा शोध घेण्यास उतरले होते.
दरम्यान, सोमवारी (दि. २२) सकाळी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नादरम्यान साडे दहाच्या सुमारास एक किमी अंतरावर नदी किनारी खडकाच्या शेजारी गौरव स्वामी याचे मृतदेह सापडला, तर अनुराग मांदळे याचा मृतदेह शोधण्यासाठी दुपारपर्यंत (Koregaon Bhima News) शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले असता शेवटी दुपारी २ च्या सुमारास अनुराग मांदळे यांचा मृतदेह पोहण्याच्या ठिकाणीच सापडला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Koregaon Bhima | अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मागणी…
Two Children Drowned : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत दोन मुले बुडाली