युनूस तांबोळी
Khed News : नवरात्र म्हणजे स्त्रि शक्तिचा जागर. पुर्वपार पासून स्त्रि ने काळ्या मातीत राबून सोन पिकवायच काम केल आहे. म्हणूनच स्त्रि चे जिवनामध्ये महत्व, गरज, त्याग, शक्ती कळते. मुलगी ही परक्याच धन असते. तेथेही ती आपले कर्तव्य बजावते. ती चे जीवन त्यागमय असते. अशा त्यागामुळे घरात लक्ष्मीचा सहवास आणि कुटूंबाला सुख शांती मिळते. चांडोह ( ता. शिरूर ) येथील शेतकरी महिला तृप्ती सुदर्शन भाकरे यांनी तुटपूंजी शेती व्यवसाय करून कुटूंब सावणारी खरी नवदुर्गा ठरली आहे.
शेती व्यवसाय करून कुटूंब सावणारी खरी नवदुर्गा
खेड तालुक्यातील कडूस येथील गरीब शेतकरी कुटूंबात तिचा जन्म झाला. लहानपणापासून मावळ पठारावरील जीवन व्यतीत केलेल. शेतात भात लागवडीपासून सर्व कामे करून काटेरी वाटेवर शिक्षणासाठी धावणारी ठरली. पण सुसंस्कारीत असणारी तृप्तीने दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. (Khed News) आई वडीलांना शेती व्यवसायात मदत करत अगदी आनंदीमय वातावरणात घालवली. ऊन पावसाच्या खेळात गरीबीचे चटके सोसत भांवडासमवेत रममाण व्हायची. मुलगी म्हणजे परक्याच धन ते एक ना एक दिवस दुसऱ्या घरी जाणार ठरत. तसा तृप्तीचा देखील प्रापंचीक प्रवास सुरू झाला.
चांडोह ( ता. शिरूर ) येथील पोलिस पाटिल सुदर्शन भाकरे यांच्या गरीब कुटूंबात तृप्ती चा विवाह झाला. वडील पोलिस पाटील अशोक भाकरे यांच्या निधनानंतर सुदर्शन एकाकी झाला होता. कुटूंबावर असणार कर्ज कस फेडायच असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. तीन बहिनीचा विवाह करून त्यांनी स्वतः विवाह केला होता. त्यातच काही जमीनीचा भाग देखील गहान होता. (Khed News) आई मंगल हिने मात्र धिर सोडला नाही. उरलेली जमीन कसून कसाबसे प्रपंचाला कष्टाची जोड दिली होती. सुदर्शन ने देखील कष्ट करून बहिनींच्या सर्व अपेक्षा पुर्ण केल्या. त्यातून अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्याला तो देखील डगमगला नाही.
प्रपंचाला पत्नीची साथ असावी की दोन्ही चाके सुरळीत वाटेवर चालतात. तसा गरीबीतून तृप्ती सुदर्शन चा संसार उभा राहिला. साई आणी इश्वरी असे एक मुलगा अन एक मुलगी या संसाराच्या वेलीवर फुल बहरली. भक्ती तुटपुंज्या शेतावर पिक घेऊ लागली. जमेल तसे उत्पादन घेऊ लागली. गोठ्यात संकरीत गायी संभाळू लागली. सासू तर आई सारखी तिच्या पाठीशी उभी राहिली. (Khed News) घरचा शेती व्यवसाय करून तृप्ती रोजाने दुसऱ्याच्या शेतात देखील काम करत राहिली. त्यामुळेच या कुटूंबाच्या कष्टाला बहर आली.
दरम्यान, पोलिस पाटील म्हणून सुदर्शनचे देखील चांगलाच प्रशासनात नावलौकीक आहे. तर शेती व्यवसाय करून या कुटुंबाने गहाण ठेवलेली जमीन सोडवली. सध्या सोडविलेल्या जमीनीत पिक घेऊ लागले आहेत.
शेतमाल व दुधाला हमीभाव
शेतात पिकले तर बाजारात भाव मिळत नाही. बाजारात भाव असतो तेव्हा शेतात पिक नसते. अशा विचीत्र परीस्थीती शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेहमीच येते. सरकार शेतमाल आयात करते. ग्राहक आणि मिडीया भाव वाढल्याची ओरड करते. भाव वाढल्यानंतर शासन मदत करत नाही. ज्या महिलांचा शेतीवर उदरनिर्वाह आहे. असा महिलांना खुप संघर्ष करावा लागतो. शेतमालाला आणि दुधाला हमी भाव द्यावा. अशी अपेक्षा महिला शेतकऱ्याची असते.तृप्ती भाकरे (महिला शेतकरी – चांडोह ता. शिरूर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Khed News : वेगाने आलेल्या कंटेनर चा अचानकपणे ब्रेक दाबल्याने; चालकाचा जागीच मुर्त्यू;
Khed News : राजगुरूनगर येथे होणार मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा..