पुणे: मध्य रेल्वे विभागाचे सेवानिवृत्त वरिष्ठ यांत्रिक अभियंता कानिफा सीताराम कदम (वय-85) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे व परतुंडे असा मोठा परिवार आहे. थेरगाव येथील प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव भारती गवळी, ॲड. विद्या सोनवणे व महेश कदम यांचे ते वडील होत. तसेच पुणे प्राईम न्यूजचे उपसंपादक विशाल कदम यांचे ते चुलते होत.
दरम्यान, कानिफा कदम यांच्या पार्थिवावर बदलापूर (जि. ठाणे) येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय व रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.