दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील कानगाव येथे ग्रामसभेवरून २० ते २५ जणांच्या दोन गटात तलवारी, लाठ्या काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वैभव शांताराम गवळी (वय – २२, रा. कानगाव, ता. दौंड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ग्रामसभेत प्रश्न विचारले म्हणून ही मारहाण झाल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली आहे. सदर ठिकाणी यवत पोलीस दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, कोणत्या कारणावरून भांडणे झाली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..