राजेंद्रकुमार शेळके.
Junnar News :जुन्नर : जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावातील युवक प्रकाश बबन नलावडे (वय- ३८) यांच्या दशक्रियाच्या निमित्ताने हृदयरोग जनजागृती मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. (Heart disease awareness guidance on the occasion of Dashakriya ritual of youth; A different ideal placed before the society)
हृदयरोग जनजागृती मार्गदर्शन
दहा दिवसांपूर्वी नलावडे परिवारातील युवक प्रकाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि नलावडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. (Junnar News ) यातून सावरत समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे दुःख आपल्या वाट्याला आलेले आहे, हे इतर कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी (हार्ट अटॅक) हृदयरोग विषयावरती जनजागृती करण्याचे त्यांनी ठरवले.
नारायणगाव येथील विघ्नहर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष बोळीज व डॉ. दयानंद गायकवाड यांनी उपस्थितांना हृदयरोग म्हणजे काय, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना व आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे याविषयीं मार्गदर्शन केले. (Junnar News ) दशक्रिया विधीनंतर या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Junnar News : बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
Junnar News : आश्रमशाळेतील पाण्याच्या टँकरचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच