संतोष पवार
पळसदेव: रूई बाबीर (ता. इंदापूर) येथील हर घर पेयजल योजना खूप दिवसापासून प्रलंबित होती. जानेवारी 2025 मध्ये पत्रव्यवहार करून देखील अद्याप पर्यंत प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज बारामती याठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे यांनी रुई येथील हर घर जल योजनेचे काम बऱ्याच दिवसापासून बंद असल्याचे सांगितले. यावरती लगेच तात्काळ प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांना बोलवून संबंधित योजना तात्काळ चालू करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले.
इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर रुई ग्रामस्थांच्या वतीने याबाबत एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेले होते. या आंदोलनाला इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी भेट देवून संबंधित प्रश्नांना न्याय देण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम दि. 14/05/2025 पर्यंत त्वरित चालू करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी जनार्दन पांढरमिसे,आकाश कांबळे, आबासाहेब थोरात, यशवंत कचरे, तानाजी मारकड, अनिल कांबळे, प्रविणकुमार शहा, अविनाश मोहिते, सतिश झेंडे, भाजपा पुणे जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, ॲड किशोर अडसूळ, बंडु डोंबाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.